कोकण

कणकवली महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू

CD

कणकवली महाविद्यालयामध्ये
व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः कणकवली कॉलेज, कणकवली येथे टूरिझम अॅंड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अकरावीचा प्रवेश सुरू झाला आहे. हॉटेल मॅनेजमेंट, टूरिझम मॅनेजमेंट, कॅटरिंग मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, फूड सर्व्हिस मॅनेजमेंट, ट्रॅव्हल एजन्सी मॅनेजमेंट यासारख्या उपयुक्त विषयांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास यामध्ये समाविष्ट आहे.
बारावीनंतर या विषयांमध्ये विशेषतः पदविका किंवा पदवी घेतल्यास नोकरीची संधी उपलब्ध होत असते. हे कोर्स पूर्ण करून नोकरी तसेच स्वयंरोजगार मिळविण्यासाठी अर्धवेळ नोकरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना देखील अकरावीमध्ये प्रवेश घेता येईल. हा अभ्यासक्रम शासनमान्य व पूर्ण अनुदानित स्वरुपाचा असल्याने अकरावीचा प्रवेश मोफत असणार आहे. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असल्यामुळे येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. येथील मुलांनी योग्य शिक्षण घेऊन या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. दहावीमधील गुणांची टक्केवारी बारावीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. अधिक माहितीसाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कणकवली कॉलेजमध्ये श्री. कोरगावकर, श्री. भिसे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT