कोकण

निरागसता, संवेदनशीलतेसाठी कवितेत चित्रे

CD

-rat१०p१४.jpg-
२४M८९१८७
वांद्रे : बालसाहित्यिक सूर्यकांत मालुसरे यांच्या चांद्रयान बाल काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना नमिता कीर, डॉ. दत्ता पवार, प्रतिभा मालुसरे, डॉ. सुनील सावंत व डॉ. कृष्णा नाईक.
---------------
निरागसता, संवेदनशीलतेसाठी कवितेबरोबर चित्रे

नमिता कीर ; साहित्यिक मालुसरे यांच्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १० : बालसाहित्यिक सूर्यकांत मालुसरे हे हाडाचे गुरुजी असल्याने त्यांच्या मनात कायम विद्यार्थी असल्याने या बालकविता लिहिलेल्या गेल्या आहेत. त्यात विज्ञान ते भगवानपर्यंतच्या कविता आहेत. अशा संस्कारक्षम कविता निर्माण व्हायला हव्यात. मुलांमधील निरागसता कमी झाली आहे. त्यांची संवेदनशीलता कमी झाली आहे. म्हणून शब्दांप्रमाणे आता कवितेबरोबरच चित्रेही आली आहेत. ती आपल्याला बरेच काही सांगतात, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केले.
सूर्यकांत मालुसरे यांच्या चांद्रयान या बालकविता संग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर डॉ. पवार बोलत होते. वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीत कार्यक्रम झाला. चित्रातून लहान मुले शिकतात. सध्याचा काळ साहित्याच्या दृष्टीने कठीण आहे. कारण मुलांचे बालपण हरपले आहे, हा काळाचा शाप आहे. पुस्तकांच्या माध्यमातून मुलांकडे जाणे कठीण असल्याने आता त्यांच्याकरिता डॉक्युमेंट्री निघायला हव्यात. मोबाईलची आणि कपड्यांची किंमत परवडते मग पुस्तकांची किंमत का परवडत नाही. पालकांनी मुलांना पुस्तकांची गोडी लावायला हवी, असे प्रतिपादन डॉ. दत्ता पवार यांनी अध्यक्षपदावरून केले.
नॅशनल लायब्ररीचे कार्यवाह प्रमोद महाडिक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, दूरदर्शन माजी निर्माता मोहनदास मुंगळे, डॉ. कृष्णा नाईक आणि डॉ. सुनील सावंत उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे विधी सल्लागार ॲड. यशवंत कदम आणि प्रा. सतीशचंद्र चिंदरकर उपस्थित होते. कवी, समीक्षक शिवाजी गावडे यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. त्यात श्रीकांत जाधव, डॉ. मनोज वराडे, चंद्रकांत कवळी, कमलाकर राऊत, मकरंद वांगणेकर, सोनाली जगताप, सूर्यकांत आंगणे, मनीषा घेवडे, पुष्पा कोल्हे, रमेश सावंत, जयश्री संगीतराव, अनिल खेडेकर, नीमा चिटणीस, मनोज धुरंधर, स्वप्नील म्हात्रे आणि पूजा काळे या निमंत्रित कवी व कवयित्रींनी विविध विषयाच्या कविता सादर केल्या. त्यांना रसिकांची चांगलीच दाद मिळाली. प्रास्ताविक डॉ. सुनील सावंत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : गोरेगावमध्ये ट्रक-बस अपघात: सहा प्रवासी जखमी, बसचालक ताब्यात

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT