कोकण

मृगाच्या पालखीचा सोहळा बांदेश्वर मंदिरात उत्साहात

CD

89229

मृगाच्या पालखीचा सोहळा
बांदेश्वर मंदिरात उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराचा मृगाच्या पालखीचा सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. बांदेश्वर भक्तांच्या गर्दीत वाजतगाजत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली. या पालखीला वरुण राजानेही हजेरी लावली.
दरवर्षी श्री बांदेश्वराच्या जत्रोत्सवापासून या पालखी सोहळ्याला प्रारंभ होतो. त्यानंतर दर सोमवारी मंदिराभोवती ही सवाद्य पालखी प्रदक्षिणा होते. यावेळी मंगलमय वातावरणात भाविक अभंग गायन करतात. त्यानंतर पालखीचे मंदिरात आगमन होऊन आरती व शिवनामाचा गजर केला जातो. हा सोहळा मृग नक्षत्रापर्यंत म्हणजेच मिरगापर्यंत दर सोमवारी सुरू असतो. मिरगाच्या पालखीने या सोहळ्याची सांगता होते. शुक्रवारी ही मिरगाची पालखी झाली. दरवर्षीप्रमाणे मिरगानिमित्त मंदिरात श्रींची महापूजा आयोजित केली होती. नीलेश महाजन यांनी सपत्नीक पूजन केले. रात्री ९ वाजता पालखी सोहळा प्रारंभ झाला. मोठ्या भक्तिमय वातावरणात ही पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाली. मंदिरात पालखीचे आगमन होताच भजन व महाआरती करण्यात आली. ‘जय बांदेश्वर जय बांदेश्वर गजर गर्जत, पालखी चाले जत्रेपासून मिरगापर्यंत’, ‘शिव शिव शिव शिव सांब सदाशिव, हर हर हर हर सांब सदाशिव’, अशा विविध गजरात भाविक दंग झाले. आरतीनंतर मानकरी सगुण सावंत यांनी सर्वांच्या कल्याणासाठी साकडे घातले. त्यानंतर तीर्थप्रसाद वाटण्यात आला. मिरगाची पालखी झाल्यानंतर सोमवारपासून दर सोमवारी मंदिरात रात्री ८ ते ९ या वेळेत भजनसेवेला आरंभ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Audio Clip : मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर ठाकरे गटातील बड्या नेत्याची एन्ट्री, म्हणाले कुवत पाहा

Nagpur Weather: पूर्व विदर्भात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

टाइगर श्रॉफच्या शूटिंग प्रकरणात मोठी अपडेट! टीव्ही न्यूजच्या आधारे शूटर्सना मास्टरमाइंडच्या सूचना, ११ जणांना अटक

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

'जी आग लागायची ती लागली', राज ठाकरेंची सरकारवर खरमरीत टीका, 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT