कोकण

राजापूर मतदारसंघ कॉंग्रेसला हवा

CD

राजापूर मतदारसंघ कॉंग्रेसला द्या

हुस्नबानू खलिफे ः प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तळागाळामध्ये काँग्रेस रूजलेली आहे. अनेक ग्रामपंचायतींसह राजापूर पालिका, सहकार क्षेत्रावर प्राबल्य असून या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला राजापूर मतदारसंघामध्ये मिळविलेल्या मताधिक्क्यामध्ये काँग्रेसचे योगदान आहे. त्यामुळे राजापूर मतदारसंघ काँग्रेसला मिळायला हवा, अशी मागणी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केली आहे.
काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून राजापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची मागणी केली जात असून तसा प्रस्ताव काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक पातळीवरून पाठविण्यात आल्याची माहिती खलिफे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदारसंघातून स्थानिक उमेदवाराची मागणी केली जात असून त्याप्रमाणे विधानसभेची निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहे. पक्षाने संधी दिल्यास विधानसभेची निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
सौ. खलिफे म्हणाल्या, राजापूर मतदारसंघावर काँग्रेसचे गेल्या चार दशकांहून अधिककाळ वर्चस्व आहे. मतदारसंघामध्ये तळागाळामध्ये काँग्रेस रूजलेली असून ग्रामपंचायतींसह अनेक सहकारी संस्थांवरही काँग्रेसचे वर्चस्व आहे. राजापूर पालिकेवर अनेक वर्ष काँग्रेसचे बहुमत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजापूर मतदारसंघातून राऊत यांना मिळालेल्या मताधिक्क्यामध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT