कोकण

आदिवासीच्या शोधार्थ पथके रवाना

CD

‘त्या’आदिवासीचा पथकाद्वारे शोध सुरू

बिबट्या नखे तस्कर प्रकरण ; वनविभागाचा तपास गतीमान

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथे बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी येथील वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या ''त्या'' संशयितांकडून महत्त्वाचे धागेदोरे वनविभागाच्या हाती लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने तपास गतिमान केला आहे. बिबट्याची शिकार करणाऱ्या ''त्या'' आदिवासी व्यक्तीच्या शोधार्थ विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत.
चिपळूण वनविभागाच्या पथकाने बिबट्याची नखे तस्करी प्रकरणाचा शिताफीने छडा लावत दिलीप सावळेराम कडलग (घाटकोपर- मुंबई), अतुल विनोद दांडेकर (चेंबूर - मुंबई), विनोद पांडुरंग कदम (सावर्डे-चिपळूण), सचिन रमेश गुरव (गोविळ-लांजा) यांना गजाआड केले आहे. या चौघांकडून ६ लाखांची बिबट्याची ८ नखे वनविभागाच्या पथकाने हस्तगत केली आहे. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा व दुचाकी जप्त केली आहे. या बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणात लांजा तालुक्यातील गोविळ येथे वास्तव्यास असलेला संशयित सचिन रमेश गुरव हाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने चार-पाच वर्षापूर्वी वास्तव्यास आलेल्या एका आदिवासी व्यक्तीकडून बिबट्याची ८ नखे खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्या आदिवासी व्यक्तीने बिबट्याची नेमकी कुठे शिकार केली, याचा वनविभागाच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे. बिबट्याची शिकार करणाऱ्या त्या आदिवासी व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी आवळण्यासाठी वनविभागाच्या पथकाने कंबर कसली आहे. त्याच्या शोधार्थ वनविभागाने विविध ठिकाणी पथके पाठवल्याचे समजते. अधिक तपास विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे व त्यांचे सहकारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT