कोकण

मुंबई-गोवा वाहतूक पूर्वपदावर

CD

मुंबई-गोवा वाहतूक पूर्वपदावर
खेड, ता. १० : मुंबई-गोवा महामार्गावर महाड-नडगाव (रायगड) गावाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प होती. प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने दरड बाजूला हटवल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पावसामुळे नडगावनजीक अचानक दरड कोसळली होती. सुदैवाने दरडीमुळे कोणत्याही स्वरूपाची हानी झाली नसली तरी डोंगरातून आलेल्या दगडांमुळे महामार्ग काही काळ बंद ठेवावा लागला. रुंदीकरणाचे काम करत असताना मुसळधार पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचा अपघात होणार नाही, याची खबरदारी महामार्ग खात्याने न घेतल्यामुळेच कोसळलेल्या दरडीमुळे वाहनचालकांची कोंडी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावनजीकही डोंगर फोडून रुंदीकरण करण्यात आले आहे. तेथे दरडी कोसळण्याचा धोका कायमच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT