कोकण

राणे यांना डावलल्यामुळे कोकणवासीयांचा अवमान

CD

राणे यांना डावलल्यामुळे
कोकणवासीयांचा अवमान

डॉ. परुळेकरांची मंत्रिपदावरून टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने विजयी केले; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने मंत्रिपद नाकारून कोकणी जनतेचा अवमान केल्याची टीका ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकातून केली.
डॉ. परुळेकर यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एनडीएचे पंतप्रधान मोदी यांचा रविवारी (ता.९) दिल्ली येथे शपथविधी पार पडला. मोदींसोबत भाजपसह एनडीए मित्र पक्षाच्या मिळून ७२ जणांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाच्या शपथा घेतल्या; पण या सगळ्या सोहळ्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. साडेचार लाख मते देऊन येथील जनतेने लोकसभेत पाठवलेल्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारून मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने कोकणातील जनतेचा अवमान केला आहे. मोहोळ आणि खडसेंसारख्या अनुभवाने कमी असलेल्या खासदारांची वर्णी मात्र मंत्रिपदासाठी लावत असताना माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या राणेंना डावलून मोदी आणि पक्षनेतृत्वाने राणेंचा आणि येथील जनतेचा अपमानच केलेला आहे, असे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.
89261

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT