कोकण

महावितरण विरोधात तुरळवासी आक्रमक

CD

महावितरण विरोधात तुरळवासीय आक्रमक

संगमेश्वर, ता. ११ ः संगमेश्वर तालुक्यातील तुरळ शाखेच्या अखत्यारितील ग्राहक महावितरणच्या अनागोंदी कारभाराला चांगलेच वैतागले असून, या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. नेहमी खंडित होणारा वीजपुरवठा, गंजलेले वीजखांब, सदोष वीजवाहिन्या, अनियमित वीजबिले अशा विविध समस्यांनी येथील ग्राहक त्रासले आहेत; मात्र महावितरणचा अनागोंदी कारभार मात्र असाच सुरू आहे. पावसाळी हंगाम सुरू झाला तरीही महावितरणकडून विद्युतवाहिन्यांभोवती वाढलेल्या झाडाची साफसफाई झाली नसल्याचे दिसून येते. महावितरणकडून हे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक ठिकाणी ही झाडी अशीच धोकादायक स्थितीत वाढलेली असल्याचे दिसून येते. यामुळे पावसाळ्यामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो तसेच या वाहिन्यांवर झाडे पडून वीजवाहिन्या तुटण्याचे प्रकार घडून येतात. वीजबिल वसुलीवर कर्मचारी पाठवून अशा गंभीर बाबींकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महावितरणचा अनागोंदी कारभार असाच सुरू राहिला तर मात्र जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये तत्काळ सुधारणा करून ग्राहकांना सुरळीत सेवा द्यावी, अशी रास्त अपेक्षा ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT