कोकण

सावंतवाडीत २२ पासून योग जागरण शिबिर

CD

सावंतवाडीत २२ पासून
योग जागरण शिबिर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २२ ते २४ जून या कालावधीमध्ये तीन दिवशीय विनाशुल्क योग जागरण शिबिराचे आयोजन येथील पतंजली योग समिती, सावंतवाडी वैश्य समाज व तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केले आहे. हे तीन दिवसीय शिबिर येथील शिवाजी चौक वैश्यभवन येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये होणार आहे.
या शिबिरास योगशिक्षक विकास गोवेकर, दत्तात्रय निखार्गे व विद्याधर पाटणकर हे आरोग्य संवर्धनासाठी नित्यनेमाने कोणता योगाभ्यास करावा, यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास डिजिटल मीडियाचे जिल्हाप्रमुख अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग शिबिराचे उद्घाटन शनिवारी (ता. २२) सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या शिबिरामध्ये रामनाथ सामंत, दत्तात्रय सडेकर, मीना सामंत, तानाजी वरक, रामजी परब व शरद कालेलकर हेही मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात आरोग्य संवर्धनासाठी नित्यनेमाने कोणता योगाभ्यास करावा, यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. साधकाने शिबिरात येताना सैल कपडे परिधान करून व सोबत स्वतःला बसण्यासाठी जाजम आणावे. या शिबिरात महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समितीचे महेश भाट, वैश्य समाज सावंतवाडीचे अध्यक्ष रमेश बोंद्रे आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

SCROLL FOR NEXT