कोकण

चिपळूण ःपावसाळ्यात ५० हजार झाडे लावणार

CD

89359

पावसाळ्यात ५० हजार झाडे लावणार
पुरोगामी शिक्षक संघटनेचा ठराव; रिक्त पदे भरण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ः पर्यावरण संरक्षणासाठी या पावसाळ्यात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्यात ५० हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार केला. कणकवली संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सभेत तसा ठराव संमत करण्यात आला.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्यनेते विजय भोगेकर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते. बैठकीत निसर्गातील वाढते तापमान व वाढलेली वृक्षतोड यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे मत बैठकीत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शिक्षकांची रिक्त पदे शंभर टक्के भरावीत, संचमान्यतेचे अन्यायकारक निकष रद्द करावेत, बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार पाचवी व आठवीचे वर्ग विनाअट जिल्हा परिषद शाळेस जोडावेत, सहावी ते सातवी अथवा सहावी ते आठवीच्या वर्गांना विनाअट ३ शिक्षक मंजूर करावेत, आंतरजिल्हा ७ वा टप्पा लवकरात लवकर सुरू करावा, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ मुक्त करावे, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना शिपाई पद मंजूर करावे, सर्व केंद्रशाळांना क्लार्क मंजूर करावे, शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा, जून व डिसेंबरमध्ये वर्षातून २ वेळा पदोन्नती घेण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना व्हावेत, नवीन भरतीतील उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश व्हावेत आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.
या वेळी राज्य नेते विजय भोगेकर, हरिश ससनकर, प्रकाश पाध्ये, जी. एस. मंगनाळे, प्रकाश पाटील, रंगराव वाडकर, प्रेमिला माने, सुरेश साळवी, गोविंद पाटील, सचिन जाधव, एस. के. पाटील, किशोर आनंदवार, इरफान मिर्झा, महेंद्र हिवे, यशवंत पेंढांबकर, प्रकाश वाडकर, प्रदीप पवार, तुषार पाटील, गंगाधर बोढे, संभाजी पाटील, नितीन पेढेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT