कोकण

गोपुरी आश्रमास ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’

CD

89440

गोपुरी आश्रमास ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ : मुलुंड, मुंबई येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘अस्मि’ प्रतिष्ठानच्या वतीने अस्मिता जयप्रकाश लब्दे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’ यावर्षी गोपुरी आश्रमास प्राप्त झाला आहे.
गोपुरी आश्रमामार्फत सातत्याने सुरू असलेल्या विविध स्वरूपातील सामाजिक व रोजगार विषयक कार्याचा गौरव व्हावा यासाठी हा ‘अस्मि’ सन्मान गोपुरी आश्रमाला देताना विशेष आनंद होत आहे, असे उद्गार अस्मि प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश लब्दे यांनी काढले. त्यांनी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर व विद्यमान सचिव श्री विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्याकडे अस्मि सन्मान सुपूर्त केला. २५ हजार रुपये धनादेश असे या सन्मानाचे स्वरूप आहे. कोकण गांधी पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७६ वर्षांपूर्वी सुरू केलेली गोपुरी आश्रम ही संस्था आजही कार्यरत आहे. वर्तमान व भविष्यकाळातील पिढीला संस्काराच्या दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी गोपुरी आश्रमासारख्या संस्था भविष्य काळात सातत्याने कार्यरत राहायला हव्यात यासाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवर काम करणाऱ्या मंडळींनी या संस्थेला आर्थिक हातभार लावण्यासाठी सहकार्य करावे असेही जयप्रकाश लब्दे यांनी सांगितले. यावेळी दिनेश पडवेकर, आशालाता पडवेकर, गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते सदाशिव राणे, कवी श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT