कोकण

प्रसिद्ध गणेशगुळे मंदिरातील दानपेटी फोडली

CD

-rat११p३२.jpg-
२४M८९४५९
पावस ः स्वयंभू गणेशगुळे येथील गणेश मंदिराची दानपेटी फोडण्यात आली.
----------------

गणेशगुळे मंदिरातील दानपेटी फोडली

दोन दिवसातील दुसरी घटना ; सीसीटिव्हीत दोन चोरटे कैद

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ११ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्याने फोडून त्यातील पैशांवर डल्ला मारला. बारा वर्षानंतर पुन्हा एकदा दानपेटी फोडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावस परिसरातील या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

श्री क्षेत्र गणेशगुळे येथील गणेश मंदिरामध्ये संस्थांच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्या माध्यमातून चोरांचा शोध लागण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. १०) रात्री पावणेदोनच्या सुमारास या मंदिराचा दोन संशयितांनी दरवाजा फोडून गणपतीसमोर बसवण्यात आलेली दानपेटी कोयत्याने फोडली व त्यातील रक्कम लंपास केली. ही पेटी मजबूत असल्याने ती फोडण्यासाठी सुमारे एक तास लागल्याचे दिसत आहे. ही घटना रात्री घडल्याने त्या मंदिरामध्ये साफसफाईसाठी एक व्यक्ती नेहमी जात असते. त्या वेळी त्याच्या ही घटना लक्षात आल्यानंतर सातच्या सुमारास पोलिसपाटील संतोष लाड यांना कळविले. त्यानंतर त्यांनी ही घटना पूर्णगड पोलिसांना कळवली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथक आणण्यात आले होते. श्वानपथकाने चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्रीच्यावेळी पाऊस पडल्यामुळे काही ठराविक अंतरापर्यंत त्यांना जाता आले. दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाले असून ते रात्रीच्यावेळी दुचाकीवरून आल्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी मेर्वी गुरववाडी येथे एका बंद घराचा दरवाजा फोडून ४५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली होती. दोन्ही चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची चक्री वेगाने फिरू लागली आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT