कोकण

सावरवाडला वृक्षारोपणाने कृषी सप्ताहाला सुरुवात

CD

सावरवाडला वृक्षारोपणाने
कृषी सप्ताहाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः कृषी दिनानिमित्त सावरवाड गावात छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांनी कृषी सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
या सप्ताहात कृषिदिंडी, मोफत नेत्र चिकित्सा, वृक्ष लागवड, शेतीत लागणाऱ्या विविध अवजारांची माहिती व शेतीचे यांत्रिकीकरण आणि सामुदायिक शेती याचे महत्त्व याविषयी घरोघरी मार्गदर्शन, कृषी विषयक सरकारी योजनांची माहिती व तात्काळ विमा उपलब्धतेबाबत माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आज झालेल्या कार्यक्रमाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, प्रा. प्रसाद ओगले, प्रा. गोपाल गायकी, डॉ. बापू भोगटे, प्रा. विवेक खरात, प्रा. भावना पाताडे, प्रा. महेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अथर्व मठकर, लक्षद्विप शेटकर, श्रीनिवास वाळके, ऋत्विक तेली, अनिरुद्ध. पी, अरुणदेव
सी. पी. यांनी आयोजन केले होते.
94147

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT