वेंगुर्लेमध्ये रोटरी क्लबतर्फे
शेतकऱ्यांना झाडांची रोपे
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः रोटरी वर्ष २०२४-२५ या नवीन रोटरी वर्षाच्या पहिल्याच दिवशी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊनचा कार्यभार नव्याने स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांतर्फे १० प्रगतशील शेतकऱ्यांना नारळाची झाडांची रोपे वाटप केली.
अध्यक्ष योगेश नाईक, सेक्रेटरी अॅड. प्रथमेश नाईक आणि संपूर्ण क्लब सदस्यांनी कृषिदिन व डॉक्टर दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम घेतला. यावेळी शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा करण्यात आला. डॉक्टर डेनिमित्त रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लेचे मिडटाऊनचे सदस्य डॉ. राजेश्वर उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटल येथे त्यांच्या अविरत रुग्ण सेवेबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी डॉ. उबाळे यांनी नवीन रोटरी वर्षानिमित्त नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत रोटरीमार्फत अविरत लोकसेवेचे व्रत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे नूतन अध्यक्ष योगेश नाईक, सेक्रेटरी अॅड. प्रथमेश नाईक, माजी अध्यक्ष राजू वजराटकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, सुनील रेडकर, धनेश आंदुर्लेकर, वसंतराव पाटोळे, उदय दाभोलकर आदी रोटरीयन उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.
94146
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.