कोकण

खरीप हंगामातील पीक विमा योजना १५ जुलै पर्यंत

CD

खरीप हंगामातील पीक विमा
योजना १५ जुलै पर्यंत

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २ ः खरीप हंगामातील भात पीक नुकसानीमध्ये पिक विमा उतरवण्यासाठी आता १५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. गेल्या दोन-चार वर्षांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पीक विमा उतरवण्यासाठी एक रुपया खर्च करावा लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास हा विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे नसल्यास त्यांनी योजनेत सहभागी न होण्याची घोषणापत्र सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवसांच्या अगोदर बँकेत देणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे ही विमा योजना राबविण्यात येत आहे. नोंदविलेली पिके अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांची ई- पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करावी. योजनेची अंमलबजावणी करताना रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन, डिजिटल माहिती स्त्रोत अशा आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. भरपाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीच्या अधीन राहून असेल यावर्षी खरीप हंगामात या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना १५ जुलै पर्यंत पिक विमा उतरणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates: नाशिकमधील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी होणार नाहीत

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

SCROLL FOR NEXT