कोकण

बाबासाहेब कांबळे यांना साहित्यगौरव पुरस्कार

CD

कृषिदिनानिमित्त
करबुडेत वृक्षदिंडी
रत्नागिरी : जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती, करबुडे ग्रामपंचायत आणि माध्यमिक विद्यालय करबुडे यांच्यावतीने आयोजित कृषिदिन कार्यक्रमात मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर मंदिर ते ग्रामपंचायतदरम्यान वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वृक्षदिंडीचे सर्व नियोजन शिक्षक गजमल बहिरम यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार (भाप्रसे), अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, कृषी विकास अधिकारी, सरपंच संस्कृती पाचकुडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,  लाजुळ विद्यालयाचे राष्ट्रीय हरितसेनेचे सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक गजमल बहिरम, रघुनाथ पाचकुडे आदी उपस्थित होते.
---------------
94218

बाबासाहेब कांबळे यांना
साहित्यगौरव पुरस्कार
खेडः तालुक्यातील तळे महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना राज्यस्तरीय साहित्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थेच्यावतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे निर्माता, दिग्दर्शक नितीन देशमुख, आशिष सातपुते, अभिनेत्री मानसी राणे, मेघा डोळस निर्माता, गीतकार गायिका कडूबाई खरात या मान्यवरांच्या हस्ते कांबळे यांना गौरवपत्र, मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. कांबळे यांचे सच्चा समाजसेवक बहुजनांचा सखा, प्रातिनिधिक दोन कवितासंग्रह, अनेक वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक लेख प्रकाशित झाले आहेत तसेच मी बिघडलो कथासंग्रह, सांज कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा राज्यस्तरीय साहित्यगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

--
94219

खेड युवाशक्तीतर्फे
वारकऱ्यांना कीट
खेड ः कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दौंड तालुका, पानशेत वरसगाव धरणग्रस्त वारकरी दिंडी क्र. ५० या दिंडीमधील सर्व वारकऱ्यांना खाऊ व प्रथमोपचार कीट वाटप करण्यात आले. आषाढीवारीनिमित्त जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेला वैष्णवांचा मेळा टाळमृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल झाले. या वारी सोहळ्याच्यानिमित्ताने वारकऱ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणेचे अध्यक्ष संदीप साळुंखे (खेड) यांच्या व युवाशक्तीच्या सर्व सभासदांच्या हस्ते म्हाळसाकांत कॉलेज, मेन गेट, आकुर्डी पुणे येथे खाऊ प्रथमोपचार कीटचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT