कोकण

रत्नागिरी - जिद्द, कठोर परिश्रम अंगीकारले तर यश निश्चित

CD

94230

जिद्द, कठोर परिश्रम अंगीकारले तर यश निश्चित
नमिता कीर ; कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ः त्या तिघींचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. कसे जगावे हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे तो आपण शिकला पाहिजे. त्यांची जिद्द, कठोर परिश्रम आपण अंगीकारले पाहिजेत आणि त्याप्रमाणे स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा महिला समिती आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित ''ती.... चा सन्मान या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात दक्षिण आफ्रिकेतील किलोमांजारो हे जगातले पाचव्या क्रमांकाचे शिखर काबीज करणाऱ्या पहिल्या महिला मान मिळवणाऱ्या अमृता भालेराव, ठाण्याच्या उपायुक्त आणि कवयित्री व गायिका रूपाली अंबुरे आणि अंध बँक कर्मचारी व अंध व्यक्तींसाठी भरघोस कार्य करणाऱ्या अनुजा संखे या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांनी आपले प्रेरणादायी अनुभव व त्यांचा कार्यप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवला. कार्यक्रमाच्या सुरवातीला ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी प्रास्तविक केले तसेच प्रा. हर्षदा लिखिते यांनी मनोगतात उपक्रमाची रूपरेषा सांगितली.
प्रा. मनीषा राजपूत आणि संध्या लगड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ठाण्याच्या उपायुक्त रूपाली अंबुरे यांनी पुस्तकाचे वाचनाने आपण कसे घडलो, आजोबांनी आपल्याला वाचनाची सवय कशी लावली, अमेरिकेला एम. एस करण्यासाठी जायची संधी मिळूनही एमपीएससी होऊन पोलिसदलात सेवा करण्याला दिलेले प्राधान्य आणि गुन्ह्यांचा तपास हाताळताना आलेले अनुभव या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT