९४२२७
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी राजापुरात शिबिरे
अरविंद लांजेकर; भाजपकडून लाडकी बहीण योजनेचा प्रसार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ः महायुती शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून, त्याचा तालुक्यातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर व उपाध्यक्ष सचिन शिवणेकर यांनी केले आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी भाजपाच्या माध्यमातून लवकरच विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींसाठी २१ वर्ष ते ६० वर्ष वयोमर्यादा असणार असून, पात्र महिलांना त्यांच्या आधारलिंक असलेल्या खात्यात दरमहा १५०० रुपये शासनाकडून जमा केले जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी विवाहित महिला, विधवा महिला, निराधार महिला, परितक्त्या महिला, घटस्फोटित महिला १ ते १५ जुलैपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना ऑनलाईन अर्ज, लाभार्थी महिलेचे आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५० लाखापर्यंत असणे आवश्यक), बँकखाते पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड या योजनेच्या अटीशर्तींचे हमीपत्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक असलेल्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महिला भगिनींसाठी सदरची योजना राबवल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.