कोकण

अजय तेंडुलकर यांचा राज्यस्तरीय शेतकरी पुरस्काराने गौरव

CD

94259

अजय तेंडुलकर यांचा
शेतकरी पुरस्काराने गौरव
पावस, ता. २ः कृषिदिनाचे औचित्य साधून शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान स्वराज्य सरपंच सेवा संघांच्यावतीने करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
यंदाचा सामाजिक, यशस्वी शेतकरी, उद्योजक व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा राज्यस्तरीय कृषिभूषण विशेष पुरस्कार रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथील शेतकरी अजय तेंडुलकर यांना जाहीर झाला. तेंडुलकर हे अनेक वर्षांपासून कृषिक्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. अभ्यासू, प्रामाणिक आणि सामान्य माणसाबद्दल संवेदना असणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वीसुद्धा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील माऊली सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ शंकरराव मगर, हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख पंजाबवर डक व सरपंच संघटनेचे राज्यस्तरीय समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तेंडुलकर यांचा गौरव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT