94269
शाळांमध्ये पर्यावरणविषयक जागृती
घरडा केमिकलचा उपक्रम; खेड, चिपळुणातील २० शाळांची निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ः लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल कंपनी आणि पुण्यातील ओरिअर्थ नेचर फाउंडेशन यांच्या माध्यमातून खेड आणि चिपळूण तालुक्यातील शाळांमध्ये पर्यावरण शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आला. वर्षभर दोन्ही तालुक्यातील २० शाळांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक माहिती देत जनजागृती करण्यात आली.
गेले वर्षभर सुरू असलेल्या या पर्यावरण शैक्षणिक कार्यक्रमाची वर्षपूर्तीनिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. घरडा कंपनीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडंट आत्माराम चव्हाण, जनरल मॅनेजर एच. आर. अनिल भोसले, सीएसआर मॅनेजर बापूराव पवार, कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम घाग, शरद जाधव, राम रामस्वामी, डॉ. विनायक चव्हाण, जीवन शेवाळे आदी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी पेढे येथील आर. सी. काळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित भारूड सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट सादर करण्यात आले. अमृता चव्हाण यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. विशाखा माळी, बाजीराव खाडे, संध्या भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू ठेवण्याची मागणी शिक्षकांमधून करण्यात आली. प्रभा पवार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.