योजनेसंदर्भातील दाखल्यांसाठी
देवगडमध्ये महिलांची धावपळ
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ ः राज्याने नुकतेच अतिरिक्त अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या नव्या योजनेची घोषणा केली आणि विविध पातळींवर धावाधाव सुरू झाली. दाखल्याच्या अनुषंगाने महिलांसह घरातील कर्त्या पुरुषांची धावपळ वाढली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजारात सध्या महिलांची तारांबळ असल्याचे चित्र असून, व्यावसायिकांनाही डोके वर काढायला मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
योजनेतील निकषांप्रमाणे २१ ते ६० वयोगटांतील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी उत्पन्न दाखला तसेच राज्यातील जन्म दाखला किंवा राज्याचे अधिवास प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पन्न दाखला काढण्यासाठी विविध दाखले आधी जमा करावे लागतात. त्याचे एकत्रित संकलन करून दाखला काढण्यासाठी असलेल्या विशिष्ट अर्जासोबत जोडावे लागतात. त्यासाठी सोमवारपासून (ता. १) विविध पातळीवर धावपळ वाढली आहे. दाखले मिळविण्यासाठी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वेळेत कागदपत्रे जमा करण्याची धांदल सध्या येथे वाढलेली दिसत आहे. विविध कार्यालयांत नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. येत्या १५ जुलैपर्यंत याची प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाची असल्याने त्याआधी विविध दाखले मिळावेत, यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. व्यावसायिकांकडेही अर्ज घेण्यासाठी तारांबळ असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.