कोकण

खेड तालुक्यातील ८३ प्राथमिक शाळा नादुरुस्त !

CD

94308

खेड तालुक्यातील ८३ शाळा नादुरुस्त
निधीची कमतरता; शिरवलीचं शेरवली झालं आणि दुरुस्ती प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जवळपास ८३ प्राथमिक शाळेच्या इमारती नादुरुस्त असल्यामुळे तेथील शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन आहेत. जिल्हा परिषदेकडे गेल्या अनेक वर्षापासून शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव धूळखात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील कळंबणी केंद्रातील शिरवली शाळा पावसात कोसळली. सुदैवाने, शाळा सुटल्यानंतर हा गंभीर प्रकार घडला होता अन्यथा फार मोठा बाका प्रसंग शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर ओढवला असता. शिरवलीप्रमाणे अनेक शाळा तालुक्यात आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने त्या शाळा वेळीच दुरुस्ती न केल्यास तिथे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेने शिरवली नं. १ शाळा कोसळल्यामुळे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना लेखी पत्र पाठवून स्वतःची जबाबदारी झटकली आहे. आपल्यावर शाळा कोसळल्याचा गंभीर आरोप येऊ नये म्हणून हा पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे खेड येथे उपविभाग कार्यालय आहे. येथे शिरवली शाळा नं. १ च्या दुरुस्तीसाठी आलेल्या निधीचा प्रस्ताव मंजूर होऊनही आलेला होता. तेथे नियुक्ती असलेल्या वरिष्ठ लिपिक यांनी हा प्रस्ताव शिरवली नं. १ च्या जागी शेरवली नं. १ असा बदल करून दिला. त्यामुळे शेरवली शाळेची दुरुस्ती पूर्ण झाली; पण शिरवली नं. १ मुसळधार पावसात कोसळली. हा बदलाचा प्रकार गंभीर असूनही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी कारवाई केलेली नाही, अशी नाराजी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शार्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT