कोकण

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटचे पदविका अभियांत्रिकी परीक्षेत यश

CD

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटचे यश

पदविका अभियांत्रिकी परीक्षेत १९१ विद्यार्थी उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण २०४ विद्यार्थी बसले होते. पैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कॉलेजच्या सिव्‍हिल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये बाळकृष्ण परब (८८.५३) याने प्रथम, आदित्य जडये (८७.७४) याने द्वितीय व दिव्या परब (८३.१६) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचा निकालही १०० टक्के लागला. यात पूजा लांबर (८९.०६) हिने प्रथम, शार्दुल जोग (८५.५६) याने द्वितीय व वेदांगी नलावडे (८४.६१) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ९६ टक्के लागला. स्टेफीरोज मोंटेरो (८९.८९) हिने प्रथम, सोनल गावडे (८८ टक्के) हिने द्वितीय व सुयश केरकर (८७.३७) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ८३ टक्के लागला. यात सुयोग जोशी (८८.४१) याने प्रथम, अनिरुद्ध नाईक (८६.८७) याने द्वितीय व शुभम मोडक (८४.७७) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, सिव्‍हिल विभागप्रमुख प्रसाद सावंत, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख दीपक पाटील, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रशांत काटे व मेकॅनिकल विभागप्रमुख अभिषेक राणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
94309

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

IPL Kisse: वानखेडेवर शाहरुखचा संताप! विलासराव देशमुखांचा एक निर्णय अन् 5 वर्षांची बंदी, 2012 मधील IPL सामन्यात काय घडलं होतं?

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT