आवडीच्या क्षेत्रात करिअर करा
सचिन हुंदळेकर ः तळेरे, कासार्डेतील गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवून मार्गक्रमण करा. शिका, संघर्ष करा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी विराजमान व्हा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी कासार्डे येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ प्रभाग तळेरे कासार्डे पंचक्रोशी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सोमनाथ कदम, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज व नेते मंडळ प्रभाग तळेरे कासार्डेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र देवरुखकर, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश वाघेरकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष शंकर चव्हाण, तळेरे- कासार्डे प्रभागाचे सचिव संतोष जाधव, जेष्ठ कार्यकर्ते दत्ताराम जाधव, पत्रकार दत्तात्रय मारकड उपस्थित होते.
प्रभाग सचिव संतोष जाधव यांनी प्रास्ताविक करताना तळेरे कासार्डे प्रभागाच्या कार्याचा आढावा घेऊन सातत्याने व जिल्ह्यात सर्वप्रथम विविध उपक्रम राबविणारा प्रभाग असल्याचे गौरवोद्गार करीत मान्यवरांचे स्वागत केले. तळेरे-कासार्डे पंचक्रोशीतील विविध स्पर्धा परीक्षा, तसेच दहावी बारावी क्रिडापट्टू गुणवंत, यशवंत याशिवाय विविध क्षेत्रात उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य, छत्री व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी
डॉ. सोमनाथ कदम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर यांनी ‘मला शिकायचं’ या कवितेचे सादरीकरण करुन मार्गदर्शन केले. प्रा. देवेंद्र देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय देवरुखकर, अनिल चव्हाण, विठोबा देवरुखकर, नाना देवरुखकर, हर्षद देवरुखकर आदी उपस्थित होते. शंकर चव्हाण यांनी आभार मानले.
94310
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.