विद्यार्थ्यांसह महिलांना त्वरित दाखले द्या
दीपाली भालेकर ः सावंतवाडीत तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वेळेवर उपलब्ध करून द्या, अशी मागणी आज येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी पाटील यांच्याकडे दिले.
यावेळी तृप्ती मालवणकर, तैमिन तहसीलदार, अंकिता सावंत, ज्योती मुद्राळे, योगिता आरोलकर, श्रुती सावंत, मेधा कशाळीकर, प्रीतम भालेकर, ज्योती सावंत, रेखा लाखे, शबीना मुजावर, परविन शेख, प्राप्ती राणे, विद्या गोसल, अश्विनी दळवी, लीना देसाई, स्वप्नजा सावंत, सुवर्णा देसाई आदी महिला उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की, उत्पत्राच्या दाखल्यांसाठी लागणारा घरपत्रक उतारा व वय अधिवास काढण्यासाठी लागणारा जन्माचा दाखला १५ दिवसांत मिळणे अशक्य आहे. योजनेचा कालावधी १५ जुलैपर्यंत असल्याने हे दाखले तातडीने लाभार्थ्यांना द्यावेत. दाखले सादर करतेवेळी तहसील कार्यालयात वीज नसणे, डेस्कवर दाखले करण्यास अधिकारी नसणे किंवा इंटरनेटचा समस्या, कॉम्प्युटर नसणे अशा अनेक कारणांमुळे शैक्षणिक दाखलेही वेळेवर मिळत नाहीत. याबाबत शनिवार व रविवार दिवशी विशेष यंत्रणा राबविणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी व पालकांना तसेच योजनेतील महिलांना सतत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
94324
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.