कोकण

पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून मदत

CD

पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या
कुटुंबियांना शिवसेनेकडून मदत

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २ : मुळस नदीपात्रात काही वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या हेवाळे येथील दोन युवकांच्या नातेवाईकांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. या रकमेचा धनादेश आज येथील शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांनी केसरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त केले.
हेवाळे येथील आप्पासाहेब दत्ताराम देसाई व आप्पासाहेब आत्माराम देसाई या दोन युवकांचा २००३ मध्ये मुळस येथील नदीपात्रात मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे गतवर्षी नदीवर पूल बांधण्यात आले. त्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली होती. आज येथील शिवसेना कार्यालयात दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा धनादेश अश्विनी देसाई व अन्नपूर्णा देसाई यांनी स्वीकारला. तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, उपतालुका प्रमुख दादा देसाई, तेरवण मेढे ग्रामपंचायत सदस्य मायकल लोबो, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, विठोबा पालयेकर, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, ग्रामस्थ सचिन देसाई, दत्ताराम देसाई, गुरु देसाई आदी उपस्थित होते.
94345

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT