कोकण

श्री हॉस्पिटल उत्तम वैद्यकीय सेवा पुरवेल

CD

94355

श्री हॉस्पिटल उत्तम वैद्यकीय सेवा पुरवेल
आमदार शेखर निकम ; अतिदक्षता दालनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ः कोरोना कालावधीत डॉ. अभिजित सावंत यांनी चांगलं काम केलं आहे. अनेक रुग्णांना त्यांचा आधार होता. धोका पत्करून त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांच्या मल्टिस्पेशालिटी श्री हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या अतिदक्षता दालनात (आयसीयु) डॉ. सावंत पती-पत्नी उत्तम सेवा देतील, असा विश्वास आमदार निकम यांनी व्यक्त केला.
शहरातील चिंचनाका येथील मल्टिस्पेशालिटी श्री हॉस्पिटलमध्ये आयसीयु दालनाचे रविवारी सायंकाळी आमदार निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, माजी आमदार रमेशभाई कदम, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, शशिकांत मोदी, आशिष खातू, जिल्हा बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर, डॉ. रश्मी सावंत आदी उपस्थित होते. या वेळी लॅमिनर एअरफ्लो या नव्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन डॉ. रत्नाकर घाणेकर यांच्या तर डॉ. भीमराव पवार यांच्या ओपीडीचे उद्घाटन डॉ. दिलीप पाटील यांनी केले. टुडी इको या मशिनचे उद्घाटन प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. वैभव जाधव, डॉ. अमरसिंह पाटणकर, डॉ. संजय कलकुटकी, डॉ. श्रद्धा तावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आयसीयु दालन बनवण्यासाठी काम करणारे संदीप मोरे, अमोल जोगळेकर, कयामुद्दीन खान, प्रकाश कदम यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. अभिजित सावंत म्हणाले, गेल्या १४ वर्षापासून श्री हॉस्पिटल चालवत आहे. यापूर्वी सर्जिकल व मॅटर्निटीमध्ये काम करत आहे. येथे १४ बेडचे आयसीयु सुरू होत आहे. त्यामध्ये आवश्यक टुडीइको, डायलिसिस, मेडिसिन, स्ट्रेसटेस्ट अशा सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

SCROLL FOR NEXT