कोकण

रत्नागिरी ः दाखल्यासाठी आलेल्यांवर दंडात्मक कारवाई

CD

94342

दाखल्यासाठी आलेल्यांवर दंडात्मक कारवाई
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार; पोलिस अधिक्षकांचा हस्तक्षेप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी येथील सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वाहनांची वर्दळ झाल्याने वाहतूककोंडी होत होती. या परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने गोंधळ उडाला होता. हा विषय जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत पोचल्याने ही कारवाई थांबवून वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला.
माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. गुगल प्ले स्टोअरवरून नारीशक्ती दूत नावाचे ॲप डाऊनलोड करून त्यामधून लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलेल्यांना याचा लाभ मिळणार असल्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती. अर्जासाठी एकच झुंबड उडाल्याने कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली. दाखला काढण्यासाठी येणारे दुचाकी वाहन घेऊन आवारात येत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनांची वर्दळ वाढली.
आधीच नवीन इमारतीचे काम सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी होत होती. त्यामधून मार्ग काढण्याचा त्रास वाहनचालकांना होत होता. अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केली होती; परंतु याचा फायदा घेऊन वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. त्या वेळी भाजपचे पदाधिकारी मुन्ना चवंडे यांनी पोलिसांशी संवाद साधला. नागरिकांना जर आत जाण्यासाठी पर्याय नसेल तर त्यांनी वाहने कुठे लावयाची? त्याची व्यवस्था करा आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करा, असे सुनावले. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईऐवजी वाहतूककोंडी सोडवण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले; परंतु याबाबत गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर, नीरज सिन्हा की रेखा गुप्ता...; बांकीपूरमध्ये मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण

'मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात मारलं' सावळ्याची जणू सावली फेम प्राप्तीने छेड काढणाऱ्याला शिकवली अद्दल, म्हणाली...

PM Narendra Modi: युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे; पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन, राष्ट्रीय अभियानाची सुरुवात

SCROLL FOR NEXT