कोकण

केबल चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा

CD

केबल चोरीप्रकरणी
दोघांवर गुन्हा
खेडः तालुक्यातील साखरोली पेट्रोलपंपाच्या पुढे असलेल्या खेड-दापोली रस्त्याच्या बाजूस ठेवलेली २४०० रुपये किंमतीच्या केबल चोरीप्रकरणी आसिफ तांबे, समीर सकपाळ (दोघे रा. भडगाव) या दोघांवर येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सागर अंकुश कदम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या दोघांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेली स्टर्लाईट कंपनीची केबल वायर व एफटीबी बॉक्स चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
----------
खेडमध्ये हाणामारीत
तिघे जखमी
खेडः शहरातील खांबतळे येथे दोघांनी केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. या प्रकरणी अल्ताफ मजीद शेख, नदीम मजीद शेख यांच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नसिमा शकिल शेख (२७), साहिल शकिल शेख, शकिल शेख (३५, तिथेही रा. खांबतळे-खेड) अशी तिघांची नावे आहेत. फिर्यादीच्या राहत्या घरी जेवण झाल्यानंतर पुतण्या अल्ताफ शेख हा दारूच्या नशेत घरात बडबड करत असल्याने जाऊन झोप, असे सांगितल्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साहिल शेख व शकिल शेख यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत नसिमा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT