कोकण

लांजा - चिरा वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प

CD

rat2p43..jpg -
94379
अपघातग्रस्त ट्रक

चिरा वाहतूक करणारा
ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २ः आसगे तळवडे मार्गावर कुरचुंब येथील चढावाच्या ठिकाणी एक चिरा वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने व दुसरा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. केवळ छोट्या वाहनांना ये-जा करण्यासाठी जागा शिल्लक आहे. त्यामुळे या मार्गावरील मोठी वाहने आज दुपारपासून पूर्णपणे अडकून पडली आहेत.
लांजा -आसगे, तळवडे कुरचुंबमार्गे हा रस्ता हा अवजड वाहनांमुळे अतिशय धोकादायक बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरून जांभ्या चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकची संख्या वाढीस लागली आहे. यापूर्वी एका सोळाचाकी ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत गोविळ येथील दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा रस्ता मोठ्या चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे अतिशय धोकादायक बनला असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
मंगळवारी चिरे वाहतूक करणारा ट्रक हा आसगे-तळवडे-कुरचुंब मार्गावरील तीव्र उताराच्या ठिकाणी रस्त्यावर बंद पडला होता. त्याला नेण्यासाठी आलेला दुसरा ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटा झाल्याने या मार्गावरील मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. दुचाकी किंवा रिक्षासारखी छोटी वाहने या ठिकाणी जात आहेत. या रस्त्यावरील चिरा वाहतुकीत आणि रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे. आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत जातीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT