कोकण

करूळ घाटप्रश्नी राणे गप्प का?

CD

करूळ घाटप्रश्नी राणे गप्प का?

अतुल रावराणे ः कोसळलेल्या भागाची केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः कोट्यवधी रूपये खर्चून करूळ घाटरस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. हा घाट अजून सुरू देखील झालेला नाही. परंतु, घाटरस्त्यात बांधलेली संरक्षक भिंत काँक्रीटीकरणाच्या रस्त्यासह वाहून गेली. मात्र, इतक्या गंभीर प्रकरणानंतर आमदार नितेश राणे गप्प का? असा प्रश्‍न ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी येथे उपस्थित केला.
करूळ घाटरस्त्यातील कोसळलेल्या संरक्षक भिंत आणि रस्त्यांची पाहणी श्री. रावराणे यांनी केली. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, नगरसेवक रणजित तावडे, नगरसेवक मनोज सावंत, रोहन रावराणे उपस्थित होते.
कोसळलेल्या संरक्षक भिंतीनजीकच त्यांनी पत्रकाराशी सवांद साधला. ते म्हणाले, ‘‘२४९ कोटी रूपये खर्चून २१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मजबूतीकरण केले जात आहे. परंतु, हे काम निकृष्ट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ६० ते ७० फुट लांबीची संरक्षक भिंत काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यासह वाहून गेली आहे. संपूर्ण रस्ता वाहतुकीस धोकादायक आहे. अजूनही या रस्त्याने वाहतूक सुरू झालेली नाही. परंतु, तत्पूर्वी संरक्षक भिंत कोसळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. परंतु, इतक्या गंभीर प्रकारानंतर या मतदारसंघाचे आमदार राणे गप्प का? कणकवलीत एका अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल फेकला, मालवणात मत्स्य अधिकाऱ्यांवर मासळी फेकून मारली. परंतु, कोट्यवधी रूपये खर्चून बांधण्यात येत असलेले रस्ते वाहून जात आहेत. मात्र, आमदार राणेंना त्याबाबत बोलायला आणि या प्रकाराची दखल घ्यायला वेळ मिळत नाही. हे आमदार केवळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यापलीकडे काहीही करत नाहीत.’’ या घाटरस्त्यांसंदर्भात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. याशिवाय माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे देखील हा विषय निदर्शनास आणून देणार असल्याचे श्री. रावराणे यांनी स्पष्ट केले.
----------
चौकट
सत्ताधाऱ्यांना देणघेण नाही
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. परंतु, पर्यटन जिल्ह्यासाठी रस्ते चांगले होण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था बिकट झालेली दिसून येत आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांना त्यांच्याशी काहीही देणघेण नसल्याचे स्पष्ट होत नाही, असे ते म्हणाले.
94393

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT