कोकण

सराईत चोरट्याला ३ वर्षे कारावास आणि ५० हजार दंड

CD

घरफोडी प्रकरणी
तीन वर्षे कारावास
संगमेश्वर, ता. २ ः संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला देवरुख न्यायालयाने तीन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या तपास कामाचे कौतुक होत आहे. मनोज उर्फ सुरज गोविंद कदम (वय ३६ वर्ष देवरुख रोहिदास वाडी तालुका संगमेश्वर) याने संगमेश्वर पोलीसांच्या हद्दीतील गावांमध्ये घरफोडी करून किमती ऐवज लंपास केला होता. आरोपी सुरज कदम याला संगमेश्वर पोलिसांनी देवरुख न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने आरोपीला ३ वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील श्रीमती सुप्रिया वनकर, तसेच पोलीस निरीक्षक स्मिता सुतार ,तपासी पोलीस हवालदार सी पी चव्हाण, पोलीस एस एस कामेरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Air Force Cyber Attack: अमेरिकेत मोठा सायबर हल्ला; हवाई दलाच्या क्लाउड यंत्रणेत हॅकर्सच्या घुसखोरीने खळबळ

Mumbai Indians: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार, पण बुमराहचा उपकर्णधारपदाला नकार का? चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update: शरद पवार माझगाव कॅन्सर रुग्णालयातून पुन्हा 'ब्रीच कँडी'मध्ये दाखल

Gun Master G9 Audience Review : इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? जेनेलियाचा अंदाज, अपारशक्तीची खलनायकी अन् हिमेशचे संगीत; पाहा प्रेक्षक काय म्हणाले!

शुक्राच्या राशीबदलाने ३ राशींचं टेन्शन वाढणार! ३५ दिवस सांभाळून राहा; खर्चासह वैवाहिक आयुष्यातही तणाव वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT