कोकण

रेशन दुकानदारांच्या मागण्या पूर्ण करा

CD

94406

रेशन दुकानदारांच्या मागण्या पूर्ण करा

जिल्ह्यातील दुकानदारांची मागणी : निवासी उपजिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ : जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी आपल्‍या १४ प्रमुख मागण्यांबाबत राज्‍य शासनाला निवेदन दिले आहे. त्‍याअनुषंगाने सध्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी आज केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी निवासी उपजिल्‍हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्‍हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर यांच्यासह सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणपत राणे, मालवणचे अमित गवडे, देवगडचे विकास गोखले, कणकवलीचे किशोर नारकर, आदींसह जिल्ह्यातील इतर रेशन दुकानदारांनी आज निवासी उपजिल्‍हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन दिले.
निवेदनात म्‍हटले आहे की, रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये पन्नास रुपये वाढ करण्याबाबत राज्‍यातील रास्त भाव दुकानदार संघटना आणि राज्‍याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री यांच्यात १० जानेवारीला चर्चा झाली होती. या चर्चेत मार्जिन वाढवून देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्‍वाही अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी दिली होती. मात्र, त्‍याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. याशिवाय रास्त भाव दुकानदारांच्या इतर मागण्यांही आहेत. यात शासकीय धान्य गोदामातून येणारे धान्य गोणी वजनात ५० किलोपेक्षा कमी असते, त्‍यामुळे योग्‍य वजन करूनच धान्य द्यावे, स्वच्छता आणि वितरण यांमधील तूट मंजूर करावी, आधार पडताळणीसाठी प्रतिसदस्य पन्नास रुपये शुल्‍क लाभार्थ्यांकडून वसूल करण्याबाबतची परवानगी द्यावी, ग्राहकांना स्वच्छ धान्य पुरवावे, आदी मागण्या केल्या आहेत. राजीव पाटकर, सुदर्शन फोपे, शैंलेंदर कुळकर्णी, नीलेश सोरप, विलास पांजरी, संजय मळीक, प्रकाश बांदेकर, लक्ष्मण ठाकूर, रोहिणी गावडे, विजय सावंत, राजकुमार पारकर, अजित कांबळे, आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT