कोकण

संगमेश्वर ः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

CD

94444

होडे स्मृतिदिनानिमित्त देवरूखमध्ये
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ः बहुजनांचे कैवारी, सामाजिक कार्यकर्ते दिवंगत विलास होडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या, पाटी, पेन्सिल आणि पेन वाटप करण्यात आले. देवरूख कांजीवरा येथील जिल्हा परिषद एकता विद्यामंदिर आणि तुळसणी येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले गेले.
या कार्यक्रमाला समाजवादी गणराज्य पार्टीचे संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष मोहिन साटविलकर, सुरेश घडशी, नंदू भुवड आणि प्रतीक कदम आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे विलास होडे यांचे अपघाती निधन झाले होते. आज त्यांचा १६ वा स्मृतिदिन; पण त्यांनी केलेल्या कामामुळे आजही जिल्ह्यात त्यांचे नाव सर्वांच्या स्मरणात आहे, अशी माहिती मोहीन साटविलकर आणि सुरेश घडशी यांनी दिली. सचिन खेडेकर म्हणाले, होडे यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी कधी मिळाली नाही; पण लहानपणापासून त्यांच्या कामाबद्दल ऐकून होतो. तुटपुंज्या साधनांवर गावोगाव लढणारे कार्यकर्ते उभे करणे, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर आवाज उठवणे यामुळे आजही त्यांच्या नावाचा दबदबा आहे. होडेंचे काम माझ्यासारख्या सगळ्याच तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Threat : एका रात्रीत इराणला नष्ट करु, ती रात्र कदाचित आजची असेल... डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 एप्रिल 2026

अग्रलेख : ...आमचा शिक्षणाचा धंदा!

झोपेची पद्धत आणि कणा

ढिंग टांग : होर्मुझ : काही सोपे तोडगे..!

SCROLL FOR NEXT