कोकण

अहिल्यादेवी मंचतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

CD

नागपूर-मडगाव
स्पेशलला मुदतवाढ
खेड : कोकण रेल्वेमार्गावर आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या नागपूर-मडगाव स्पेशलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विदर्भात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी सोयीची ठरत आहे. प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत असल्याने नागपूर-मडगाव स्पेशलला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. नागपूर-मडगाव स्पेशल बुधवारी व शनिवारी, तर परतीच्या प्रवासात गुरुवारी व रविवारी धावते. ही स्पेशल २९ जूनपर्यंत धावणार होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने स्पेशलच्या सेवा वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यानुसार स्पेशल २८ सप्टेंबरपर्यंत, तर परतीच्या प्रवासात २९ सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
------
अहिल्यादेवी मंचतर्फे
शैक्षणिक साहित्याचे वाटप
खेड : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या माध्यमातून तालुक्यातील धनगर समाजातील २६० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील धामणंद, मिर्ले, खोपी, अस्तान, बिजघर, आंबवली, वडगाव, खवटी या दुर्गम भागातील धनगरवाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यासाठी मुंबई येथील एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स फाउंडेशन, मुंबई सेवार्थ फाउंडेशन या संघटनांचे सहकार्य लाभले. एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स फाउंडेशनचे प्रमुख अनिल झोरे, सेवार्थ फाउंडेशनचे निशांत सानप, परेश हणमशेट, प्रकाश विश्वकर्मा, अस्मिता सामंत यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. या प्रसंगी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे, अण्णा गोरे, मनोहर ढेबे, नारायण ढाणक, पप्या आखाडे, गंगाराम आखाडे, सतीश आखाडे, दीपक जानकर, अनंत आखाडे, भालचंद्र बावदाणे, शंकर खरावते आदी उपस्थित होते.

-------
शिवसेना सदस्य
नोंदणी अभियान
खेड : खेड येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक भरणे येथील खासगी हॉटेलमध्ये झाली. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे व शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी पक्ष सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीविषयी निर्धार करण्यात आला. खेड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक भरणे येथे झाली. या बैठकीला शंकर कांगणे, महेंद्र भोसले, रामचंद्र आईंनकर, सूरज रेवणे, पांडुरंग माने, सुप्रिया पवार, माधवी बुटाला, दिनेश चव्हाण आदींसह प्रमुख पदाधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना आमदार योगेश कदम यांनी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT