कोकण

नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका चालकाचा सत्कार

CD

rat3p9.jpg
94458

नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या
रुग्णवाहिका चालकाचा सत्कार
पाली, ता. ३ः येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका सेवेचे करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील चालक बाळू अंकुश कातकडे यांचा करमाड पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महामार्गावर वेळोवेळी झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.
नाणीज येथील संस्थानच्या राज्यातील विविध महामार्गावर एकून ५२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अपघातातील जखमींना त्या मोफत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत होते. संस्थानच्या या रुग्णवाहिका सेवेने आत्तापर्यंत २३ हजारांवर जखमींचे प्राण वाचवले आहेत. चालक बाळू कातकडे संभाजीनगर-जालना महामार्गावरील करमाड येथे कार्यरत आहेत. तिथे संस्थानची रुग्णवाहिका २४ तास कार्यरत असते. करमाड परिसर, शेकटा, गोलगाव फाटा, कुंभेफल, शेंद्रा एमआयडीसी त्या भागात ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरली आहे. २०२३ मध्ये एकूण ७८ अपघात झाले तर त्यात ९५ जण जखमी झाले. २०२४ मध्ये १ जूनअखेर ७१ अपघात झाले. त्यातील जखमींची संख्या १७५ होती. सर्वांचे प्राण वाचवल्याबद्दल कातखडे यांना गौरवले आहे. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते सत्कार झाला. या प्रसंगी पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे, सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, भागातील पोलिस पाटील व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ११ लाख नाही फक्त एक लाख दुबार मतदार, मुंबईत मतदारांची छाननी; पालिकेचे तंत्रज्ञानाधारित मॉडेल यशस्वी

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट–मनसे युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम

Nandgaon News : मिरची तोडल्याच्या आरोपावरून नांदगावच्या मजुरांवर जीवघेणा हल्ला; महिलांवर अत्याचाराचाही प्रयत्न

Ashes : इंग्लंडने अखेर लाज वाचवली, चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी जिंकली; ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव अन् WTC Point Table बदलले

Gajkesari Yog Lucky Rashi 2026: नवीन वर्षात ‘या’ राशींचे नशीब पलटणार, 'गजकेसरी राजयोग' देणार मोठं यश

SCROLL FOR NEXT