कोकण

रत्नागिरी ः एसटी महामंडळाला मालवाहतुकीतून १० कोटी उत्पन्न

CD

एसटी महामंडळाला मालवाहतुकीतून १० कोटी
दर कमी असल्याचा फायदा; विश्वासार्हता, सुरक्षितता यामुळे चांगला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः कोरोना काळात परिवहन महामंडळाने हापूस आंबा वाहतुकीसाठी माल वाहतूक सेवा सुरू केली होती. त्यानंतर मालवाहतुकीमुळे एसटीला उत्पन्नाचा आधार मिळाला आहे. गेल्या चार वर्षात रत्नागिरी विभागाला १० कोटी २३ लाख १३ हजार ५७० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. माल वाहतूक करणाऱ्या अन्य वाहनांपेक्षा एसटीचे माल वाहतुकीचे दर कमी आहेत. त्याचबरोबर विश्वासार्हता, सुरक्षितता यामुळे वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
माल वाहतुकीसाठी कंपन्यांकडून एसटीकडे थेट संपर्क साधला जात आहे. कोरोना काळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन संपल्यानंतर पाच महिन्यानंतर माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्या पाच महिन्यात एसटीच्या माल वाहतुकीवर परिणाम झाला होता. अन्य दिवसात माल वाहतुकीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी विभागाकडे ५० माल वाहतूक ट्रक असून त्या द्वारे माल वाहतूक सुरू आहे. आंबापेटीपासून मालवाहतूक सुरू झाली. त्यानंतर सिमेंट, साखर, कौले, जांभा दगड, विटा, आंबा, काजू नारळ, सुपारी कलमे, पत्रे, पाईप, तांदूळ, गहू यांसारख्या विविध वस्तूंची वाहतूक करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, नांदेड, परभणी, पुणे, जळगाव, जालना या जिल्ह्यांतून एसटीची माल वाहतूक सुरू आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाउन काळात २०२० मध्ये आंबापेटी वाहतुकीसाठी माल वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ही सेवा नियमित सुरू ठेवण्यात आली. कमी दर, सुरक्षित वाहतूक विश्वासार्हता यामुळे माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT