कोकण

प्राथमिक शिक्षक संघाचे सोमवारी धरणे आंदोलन

CD

प्राथमिक शिक्षक संघातर्फे
सोमवारी जि. प.समोर धरणे

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सोमवारी (ता. ८) दुपारी ३ ते ६ या वेळेत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गतर्फे लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून २१ जून २०२३ च्या शासन आदेशाने खुली जिल्हांतर्गत बदलीची संधी दिली होती. वेळीवेळी मागणी करून याबाबत सुमारे ८ महिन्यांच्या कालावधीनंतर ११ मार्चला कार्यवाहीसाठी धरणे आंदोलन छेडावे लागले, तरीही प्राथमिक शिक्षकांना बदलीची संधी दिलेली नसून ही शासन आदेशाची अधिकाऱ्यांकडून होणारी पायमल्ली आहे, अशी आमची धारणा आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून पूर्ततेसाठी आश्वासित केले होते. मात्र, अद्याप काही समस्यांची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ८ ला दुपारी ३ ते ६ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गतर्फे लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. जिल्हांतर्गत बदली धोरण आदेश २१ जून २०२३ ची संपूर्ण कार्यवाही करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे, विस्तार अधिकारी-केंद्रप्रमुख पदोन्नती तातडीने करणे, प्रलंबित गणित-विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना तत्काळ नियुक्त्या देणे व प्रलंबित पदवीधर वेतनश्रेणी तातडीने लागू करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजुरी करून शिक्षकांना वेळीच लाभ देणे, नवनियुक्त शिक्षकांचा सेवापट, सेवापुस्तिका भरण्यासाठी तालुकावार शिबिराचे आयोजन करणे या मागण्यांची कार्यवाही व्हावी, यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Vilas Ghule Case : घुले हत्या प्रकरणी खासदारपुत्राला दिलासा, आरोपपत्रातून नाव वगळले

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT