कोकण

साखरपा बसस्थानक नूतनीकरणानंतर पूर्ववत

CD

नव्या कायद्यांबाबत
पूर्णगडमध्ये बैठक
पावस ः पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीतील सर्व पोलिसपाटील, महिला दक्षता समिती कार्यकर्त्या व पोलिस अंमलदार यांची नवीन कायदाविषयक कार्यशाळा सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी पोलिस ठाण्यात घेतली. सर्वांना नवीन कायद्याचा उद्देश, नवीन कायद्यातील बदल याबाबत मार्गदर्शन करून सर्वांच्या शंकेचे निरसन करण्यात आले तसेच त्यांना कायद्यातील बदल व माहिती अनुषंगाने पत्रके वाटून माहिती देऊन जनजागृतीबाबत सूचना दिल्या. या संदर्भात साळुंखे यांनी कायद्यातील बदल व माहितीचा प्रत्येकाने अभ्यास करून तो जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे सांगितले
---------
साखरपा बसस्थानक
नूतनीकरणानंतर पूर्ववत
देवरूखः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा बसस्थानक गुरूवारपासून (ता. ४) पूर्ववत सुरू होणार असून याची प्रवासी जनतेने, वाहनचालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. आगारप्रमुख फडतरे यांच्या आदेशान्वये साखरपा बसस्थानकाची सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याने प्रवाशांची पायपीट व त्रास संपणार आहे. सर्व गाड्या साखरपा बसस्थानकावरून ये-जा करतील. गेल्या महिनाभर बसस्थानकाचे काम सुरू होते. काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने बस वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे.
---------
खेड काँग्रेस तालुका
अध्यक्षपदी सुर्वे
खेड : कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी तीन पदाधिकाऱ्यांचे निलंबन आणि सहाजणांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीनंतर अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. अखेर पक्षनेतृत्वाने गौस खतीब यांना पदावरून हटवून तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी खाडीपट्ट्यातील सवणस खुर्द येथील अजिम सुर्वे यांच्याकडे सोपवली आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठपका ठेवत तीन पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष खतीब यांच्यावर आगपाखड केली होती. काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपास गेल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अंतर्गत गटबाजीची दखल घेत खतीब यांनाच पदावरून हटवत तालुकाध्यक्षपदाची धुरा अजिम सुर्वे यांच्याकडे सोपवली. खतीब यांनी खाडीपट्ट्यासह अन्य भागात पक्ष संघटना वाढीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. याच योगदानाची दखल घेत पक्षाशी निष्ठावंत असलेल्या सुर्वे यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लावली आहे.

-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT