कोकण

पीएम किसान, नमो शेतकरी योजनेच्या कामावर बहिष्कार

CD

94512


किसान योजनांच्या कामावर बहिष्कार
कृषी पर्यवेक्षक संघटना : तालुका कृषि अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ः पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याबाबत कृषी पर्यवेक्षक संघटनेतर्फे लांजा तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात पीएम किसान योजना २०१९ पासून राबवण्यात येत आहे. सुरवातीला योजनेची अंमलबजावणी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार केली आहे. या योजनेचे सनियंत्रण सुरवातीला महसूल विभागाकडे होते; परंतु महसूल विभागाने ही योजना राबवण्यास नकार दिल्याने ही योजना कृषी विभागाकडे कोणतेही अतिरिक्त मनुष्यबळ व सुविधा निर्माण न करता हस्तांतरित करण्यात आली. हस्तांतरणापूर्वी कृषी, महसूल मंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेसे मनुष्यबळ व सुविधा कृषी विभागाला देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आश्वासनाची पूर्तता न करताच महसूल विभागाच्या दबावाखाली योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. योजना राबवताना येणाऱ्या अडचणींबाबत संघटनेमार्फत पत्रव्यवहार करूनही अद्याप दखल घेण्यात आली नाही.
पीएम किसानचा १७ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गर्दी करत आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सदर योजनेसाठी स्वतंत्र प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शंका निरसन करता येत नाही. त्यामुळे दोन्ही योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT