जगाला जिंकण्याचे सामर्थ्य अभ्यासात
प्रा. ज्ञानोबा फड ः वारगाव विद्यालयात सत्कार सभारंभासह साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३ ः असाध्य गोष्ट साध्य करण्याची आणि जगाला जिंकण्याचे सामर्थ्य अभ्यासात आहे. प्रामाणिकपणे अभ्यास केला, विचार, आचार चांगले ठेवले तर यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. ज्ञानोबा फड यांनी केले.
वारगांव विकास मंडळ संचलित शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या दहावी गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष शांताराम केसरकर, कार्याध्यक्ष विजय केसरकर, सुरेश मेस्त्री, सचिव रमेश शेट्ये, सदस्य सुधाकर नर, माजी विद्यार्थी संदीप राऊत, वारगाव सरपंच नम्रता शेट्ये, उपसरपंच नारायण शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान नर, शाळा समिती पदाधिकारी प्रकाश नर, एकनाथ कोकाटे, रवींद्र केसरकर, सुधीर कुलकर्णी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजा जाधव, पोलीस पाटील समीर कुडतरकर, मुख्याध्यापक हनुमंत वाळके, चंद्रकांत कानकेकर, बाळासाहेब आडोलीकर, माजी विद्यार्थी सूर्यकांत पांचाळ, दिलीप नावळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांना वारगाव विकास मंडळ, सत्यवान नर, विविध दानशूर देणगीदारांकडून मोफत दप्तर, वह्या, गणवेश देण्यात आले. तर दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, शालेय साहित्य तसेच माजी विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू, सन्मानचिन्ह व काजूचे रोप देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभरातील विविध उपक्रमात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या मुलांना गौरविण्यात आले. राजा जाधव, एकनाथ कोकाटे, रमेश शेट्ये, चंद्रकांत कानकेकर, हनुमंत वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती संधिकर यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर नर यांनी प्रास्ताविक केले.
---
एकतरी विद्यार्थी आयएएस व्हावा
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी युनिटी महत्त्वाची आहे. आणि हेच या संस्थेने सुरू ठेवले आहे. आपल्याकडील असलेले ज्ञान इतरांना दिले तर ते अधिकाधिक वाढत जाते. त्यामुळे आम्हीही नेहमीच ज्ञान देण्यासाठी तयार आहोत. आमच्या वारगाव विद्यालयाचा एकतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे आयएएस बनवा, असे आमचे स्वप्न आहे.’’
94564
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.