कोकण

पाट हायस्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी परंपरा

CD

पाट हायस्कूलची शिष्यवृत्ती
परीक्षेमध्ये यशस्वी परंपरा

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय, (कै.) एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा (कै.) डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय व इंग्लिश मीडियम विद्यालयाच्या तब्बल १५ विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
अनुक्रमे निकाल असा : पाचवी (८१.२५) : भार्गव पेडणेकर (८३.८९) ग्रामीण सर्वसाधारण विभागात जिल्ह्यात प्रथम, भक्ती तेली-कोचरेकर (७०.४६) ग्रामीण सर्वसाधारण, सहज बुरुड (६७.११) ग्रामीण सर्वसाधारण. पाचवीतून एकूण १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आठवी (५९.०९) : दिया सामंत (८४) राष्ट्रीय ग्रामीण विभागात प्रथम, गायत्री जोशी (७२) राष्ट्रीय ग्रामीण विभागात द्वितीय, शुभंकर नाईक (६८.६६) राष्ट्रीय ग्रामीण विभागात सहावा, सौमित्र मळेकर (६७.३३) राष्ट्रीय ग्रामीण विभागात सातवा, वैभवी केळुसकर (५७.३३) ग्रामीण सर्वसाधारण, प्राजक्ता दाभोलकर (६२) ग्रामीण सर्वसाधारण, वेदिका नार्वेकर (५४) ग्रामीण सर्वसाधारण,
चैतन्या कोळंबकर (५८) ग्रामीण सर्वसाधारण, शिवानी सर्वेकर (६५.३३) ग्रामीण सर्वसाधारण, स्वयम महाडिक (५८) ग्रामीण सर्वसाधारण, पूर्वा ताह्मणकर (५४.६६) ग्रामीण सर्वसाधारण, वेदश्री अवसरे (५८) ग्रामीण सर्वसाधारण. आठवीतून एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी राजेश सामंत, देवदत्त साळगावकर, अवधूत रेगे यांच्या हस्ते सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे, ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गुरुनाथ केरकर, रमेश ठाकूर, सौ. दीपिका सामंत, अंकिता मोडक, सौ. सिद्धी चव्हाण, सद्‍गुरू साटेलकर, प्रशांत चव्हाण, एकनाथ जाधव या सर्व शिक्षकांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाचवीचे शिष्यवृत्ती प्रमुख म्हणून गुरुनाथ केरकर यांनी काम पाहिले. मारुती सांगळे, जानव्ही पडते, प्रशांत जाधव, दीपिका सामंत, विनायक कांबळे, नंदिनी बुरूड, प्रगती निवतकर, आदींनी आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आठवीचे शिष्यवृत्ती प्रमुख म्हणून मारुती सांगळे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT