कोकण

वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक

CD

वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक

अनिल हळदिवे : बांदा महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ : वृक्षलागवडीसह वृक्षांची जोपासना करणे ही आपली जबाबदारी आहे. वृक्ष आयुष्यभर आपल्याला आनंद देतात; परंतु मानव आपल्या अभिलाषेपोटी वृक्षतोड करताना दिसून येतो. भविष्यात वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, याची जाणीव ठेवून व आपण निसर्गाचे देणे लागतो, या भावनेने प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड करावी, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या रानजाई निसर्ग मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हळदिवे बोलत होते. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावला पाहिजे आणि त्यामधून समाजाचे हित जपले पाहिजे. भावी पिढीच्या भविष्यासाठी पर्यावरणाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. ही जगभराची समस्या असून, त्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. निसर्ग हा पशुपक्ष्यांचा अधिवास असून, तो टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. वृक्ष लागवडीमुळे आपण निसर्ग आणि पर्यायाने पृथ्वी वाचवू शकतो, असे यावेळी डॉ. काजरेकर यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या रानजाई निसर्ग मंडळाचे उद्‍घाटन करून परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकानी सहभाग घेतला. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत रानजाई निसर्ग मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शिरोडकर यांनी केले. प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे सदस्य व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रश्मी काजरेकर यांनी आभार मानले.
----
वृक्षारोपणासाठी प्रयत्न करा
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे सचिव बाबली वायंगणकर यांनी निसर्गाचा ऱ्हास होऊ न देता विकास करणे आवश्यक आहे. वृक्षतोडीमुळे मातीची धूप होते. म्हणूनच वृक्षतोड न करता वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करा. वृक्ष हा पशुपक्ष्यांचा आधार असतो, म्हणून चांगली झाडे लावून ती जगण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक वनीकरण विभागाचे प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे अभय नाईक उपस्थित होते.
94577

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT