कोकण

म. ल. देसाई खिलाडू व्यक्तिमत्त्व

CD

म. ल. देसाई खिलाडू व्यक्तिमत्त्व

वासुदेव नाईक ः कोलगाव येथे सेवानिवृत्तीपर सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः म. ल. देसाई हे एक उमदे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागास शिक्षक म्हणून सेवा बजावताना ‘खिलाडू वृत्तीने’ सर्वांनाच आपलेसे केले आहे, असे मत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी कोलगाव केंद्राच्या वतीने श्री. देसाई यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शुभेच्छा व गौरव समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.
व्यासपीठावर सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना बोडके, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, गटसमन्वक प्रमोद पावसकर, आंबेगाव सरपंच, कुणकेरी आंबेगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, केंद्रप्रमुखाध्यक्ष नरेश कारिवडेकर व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कोलगाव केंद्राच्या वतीने आयोजित सेवानिवृत्ती शुभेच्छा व गौरव समारंभात श्री. देसाई यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेणारा, ‘गौरवगाथा’ हा गौरवग्रंथही शिक्षक मित्रांच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. श्री. देसाई यांनी कोलगाव केंद्रातील शाळा पोषण आहार शिजवणाऱ्या सर्वच स्वयंपाकीत महिलांना साड्या तसेच सर्वच शिक्षक, शिक्षिकांना भेटवस्तू दिल्या. सर्व सरपंच व शाळा व्यवस्थापन यांचाही भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. वंदना सावंत यांनी सूत्रसंचालन केले. केंद्र मुख्याध्यापक नरेश कारिवडेकर यांनी स्वागत केले. श्रीमती सुरेखा परब यांनी प्रास्ताविक केले. मृणाली पालव यांनी आभार मानले.
94609

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

SCROLL FOR NEXT