कोकण

देवगड आमदार कार्यालयात ‘लाडकी बहीण’साठी कक्ष

CD

देवगड आमदार कार्यालयात
‘लाडकी बहीण’साठी कक्ष

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ ः ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या नव्या योजनेच्या अनुषंगाने देवगड जामसंडे शहरातील संभाव्य लाभार्थी महिलांच्या सोयीसाठी येथील आमदार संपर्क कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच येथील तहसीलदार कार्यालयातही आवश्यक सहाय करण्यासाठी आपले कार्यकर्ते असतील, अशी ग्वाही भाजप पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील आमदार संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी, तन्वी शिंदे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष योगेश पाटकर, शहराध्यक्ष दयानंद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी योजनेच्या कागदपत्रांसाठी संभाव्य लाभार्थी महिलांना आवश्यक मदत होण्यासाठी आमदार संपर्क कार्यालयात मदत कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत कार्यरत राहील. योजनेच्या अनुषंगाने असलेले दाखले, कागदपत्रे, अर्ज या अनुषंगाने या कक्षात महिलांना सहकार्य करण्यात येईल. तसेच तहसीलदार कार्यालयातही संबधित दाखले वेळेत मिळावेत यासाठी कार्यकर्ते सहकार्य करतील, असे यावेळी सांगण्यात आले.
94525

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT