कोकण

फक्त ८ रेल्वेगाड्यांना थांबा, प्रवाशांना फटका

CD

94510

तुतारीसह अन्य एक्स्प्रेस सौंदळला थांबवा
माता पूर्वादेवी ग्रामविकास मंडळाची मागणी; कोकण रेल्वेला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ः कोकण रेल्वेच्या तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्यामुळे तालुकावासियांनी देशातील विविध भागांमध्ये कोकण रेल्वेच्या माध्यमातून जा-ये करणे अधिक सुलभ झाले आहे. राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्यांनाही प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून कोकण रेल्वेच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे; मात्र, या दोन्ही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आठ रेल्वेगाड्यांना थांबा मिळत आहे. त्याचा फटका तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे सोल्ये येथील राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्यावर कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसह अन्य एक्स्प्रेस गाड्यांनाही थांबा मिळावा, अशी मागणी तालुक्यातील गोठणे दोनिवडे हातणकरवाडी येथील माता पूर्वादेवी ग्रामविकास मंडळ मुंबईतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन कोकण रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती गोठणे दोनिवडे हातणकरवाडी येथील माता पूर्वादेवी ग्रामविकास मंडळ मुंबईचे सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी दिली. निवेदन खासदार नारायण राणे, आमदार राजन साळवी यांनाही देण्यात आल्याचे जड्यार यांनी सांगितले. कोकण रेल्वेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावे देशातील विविध भागांना जोडली गेली आहेत. त्याचवेळी येथील लोकांचा प्रवासही अधिक सुलभ झाला आहे. मात्र, या ठिकाणी अनेक गाड्यांना अद्यापही थांबे मिळत नसल्याचा फटका तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे. या मागण्यांसह सौंदळ येथील स्टेशनवर सुलभ शौचालय, सुसज्ज तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म आदी मुलभूत सुविधांची उभारणी करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती जड्यार यांनी दिली. राजापूर रोड आणि सौंदळ येथे दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या थांबतात.

चौकट
या रेल्वेगाड्यांना हवा थांबा
नेत्रावती एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगळूर एक्स्प्रेस, ओखा एर्नाकुलम एक्स्प्रेस, भावनगर कोचुवेल्ली एक्स्प्रेस, गांधीधाम नागरकोईल एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक मडगाव एक्स्प्रेस, हाप्पा एक्स्प्रेस.

कोट
राजापूर रोड आणि सौंदळ येथील थांब्याना प्रवाशांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वेला उत्पन्नही चांगले मिळत आहे; मात्र, या ठिकाणी काही मोजक्या गाड्या थांबतात. एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे या ठिकाणी एक्स्प्रेससह अन्य गाड्यांना थांबा मिळावा. प्रवाशांना पायाभूत सुविधा उभाराव्यात.
- यशवंत जड्यार, सेक्रेटरी, माता पूर्वादेवी ग्रामविकास मंडळ मुंबई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT