कोकण

देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत

CD

९४६६१

देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत
उदय सामंत ः शासकीय विधी महाविद्यालयालाही २५ कोटी निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्याला मंजुरी दिली. ६०० कोटींचा हा प्रकल्प असून त्यासाठी सुमारे ५० एकर जागेची आवश्यकता आहे. समुद्रावर अभ्यास (रिसर्च) करायचा असेल तर देशातील विद्यार्थ्यांना रत्नागिरीतच यावे लागणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय विधी महाविद्यालयालाही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मी दिलेल्या आश्वासनापैकी शेवटच्या दोन्ही आश्वासनाची वचनपूर्ती झाली आहे, असेही सामंत म्हणाले.
झूम मीटिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणले, ‘सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यायासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही मागण्या मान्य करत कोकणवासीयांवर असलेले प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सागरी विद्यापीठ हे देशातील पहिले आहे. यामुळे रत्नागिरीचे नाव देशात जाणार आहे. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. जेव्हा सागरी विद्यापीठ मंजूर होईल, तेव्हा तालुक्यातील ५० एकर शासकीय जागा देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. शासकीय विधी महाविद्यालयाला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प देखील २५ कोटींचा आहे. दोन्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीला देखील तत्वतः मान्यता मिळाली आहे. लवकरच याचा अध्यादेश निघेल.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारपासून त्याचे विकेंद्रीकरण करून ठिकठिकाणी कॅम्प सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कालच काही जाचक अटी मुख्यमंत्र्यांनी शिथिल केल्या आहेत. जिल्ह्यातील ५ लाख महिलांनी या योजनेचा फायदा होणार आहे. तो त्यांना मिळावा, यासाठी काम करण्याचे आदेश आढावा बैठकीत दिले आहे. कॅम्प घेताना पावसाचा विचार करून तेथे वॉटर शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात
सागरी विद्यापीठाचा प्रकल्प ६०० कोटींचा
५० एकर शासकीय जागा मिळणार
समुद्रावरील अभ्यासक येणार रत्नागिरीत
शासकीय विधी महाविद्यालयाला २५ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! मालवाहू गाडी-दुचाकीचा भीषण अपघात; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Sugarcane Payment: ऊस बिलासाठी महिलांनाही रस्त्यावर काढावी लागली रात्र; गोकुळ शुगरने १३० कोटी रुपये थकविले, २०० शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून ठिय्या

Horoscope : उद्या 28 मे! 'या' 3 राशीच्या लोकांसाठी कलाटणीचा क्षण; त्रिशक्ती योगमध्ये अचानक आर्थिक लाभ, रखडलेलं मोठं काम मार्गी लागणार

Video : अखेर राकेशचं खरं रूप अंजलीसमोर येणार ! मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षक खुश, म्हणाले..

SCROLL FOR NEXT