कोकण

गणेश कुंड परिसरामध्ये गैरप्रकार

CD

गणेश कुंड परिसरामध्ये गैरप्रकार

नांदरुख, साळकुंभा, घुमडेवासीय संतप्त ः मालवण पोलिसांकडे कारवाईची मागणी


सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : गावामध्ये ओहोळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कुंड आहेत. याठिकाणी तसेच घुमडे गाव हद्दीतील भारत गॅस गोडाऊन बाजूला असलेल्या धबधबा ठिकाणी शहरातील व बाजूच्या गावातील लोक येऊन पार्ट्या करतात. दारू पिऊन अश्लील वर्तन करतात. यासाठी गावात गस्त वाढवावी, गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थांनी येथील पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आमच्या गावामध्ये ओहोळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कुंड आहेत. येथे शहरातील व बाजूच्या गावातील लोक येऊन पार्ट्या करतात. दारू पिऊन अश्लील वर्तन करतात. आंघोळ करतात व एक प्रकारे गैरप्रकार करतात. गावातील मुली शाळा, कॉलेजमध्ये जातायेता त्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. गावातील महिला नेहमीप्रमाणे ओहोळात कपडे धुण्यास‌ जात असतात. त्यांच्या समोरही मोठ्या प्रमाणात गैरवर्तन केले जाते. महिलांनी त्यांना समजूतीने सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही उलट उत्तरे दिल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व गैरप्रकारांमुळे गावातील महिला व शाळा-कॉलेजमधील मुली यामध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील महिलांनी पुढाकार घेत या ठिकाणी कुंपण घातले. तसेच या ठिकाणी कोणीही आंघोळ, दंगा, पार्ट्या करू नये, अशा आशयाचा फलक लावला; मात्र कुंपण तोडून आत घुसून पार्ट्या, आंघोळ, दंगा असे प्रकार सुरू असल्याची खंत पोलिसांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.
--
पोलिसांकडून तातडीने दखल
दरम्यान, या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन हे प्रकार बंद होण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. या परिसरात गस्त वाढवावी. यासाठी प्रशासनाला ग्रामस्थांच्यावतीने आवश्यक सहकार्य केले जाईल; मात्र हा त्रास बंद करावा. प्रसंगी संबंधितांवर कठोर कारवाई करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली असून तसे निवेदन दिले आहे. यावेळी पोलिसांनीही गैरवर्तन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
94744

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update : भरधाव कारने ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT