कोकण

सावंतवाडी क्र. २ शाळेचा दबदबा

CD

सावंतवाडी क्र. २ शाळेचा दबदबा

शिष्यवृत्ती परीक्षेत यश; आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः ‘पी.एम. श्री’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी क्रमांक २ येथे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या १७ पैकी ८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करीत शिष्यवृत्ती प्राप्त केली. जिल्ह्यात एकाचवेळी आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान शाळेने मिळविला आहे. या यशाने शाळेने जिल्ह्यात आपला शैक्षणिक दबदबा निर्माण केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत सोहम गावडे जिल्ह्यात तिसरा व जवाहर नवोदय विद्यालयासाठी सावंतवाडी शहरात प्रथम आला. तसेच जिज्ञासा देसाई (तेरावी), योगी लेले (सोळावा), अवनी बावकर (१९ वी), सानवी सावंत (२४ वी), उत्कर्ष आदारी (२६ वा), शौर्या गावडे (४३ वी), शमिका सावळ (४६ वी) या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत यश मिळवून सलग दुसऱ्या वर्षी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांनी गणित प्राविण्य परीक्षा, भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती परीक्षा आदी स्पर्धा परीक्षेतही यश प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका भक्ती फाले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. यासाठी माजी मुख्याध्यापिका चैताली गवस, शाळेतील शिक्षिका श्रीमती ठाकूर, श्रीमती ढवळ, श्री. पाटील, श्री. सावंत, श्रीमती जाधव, श्रीमती सावंत, श्रीमती शिरसाट यांची साथ मिळाली. या यशासाठी सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सावंतवाडी केंद्रप्रमुख श्री. ठाकूर, गटसमन्वयक श्री. पावसकर, माजी केंद्रप्रमुख म. ल. देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित सावंत, शिक्षणप्रेमी नंदकुमार गावडे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Plane Crash : ओडीशामध्ये भीषण दुर्घटना! भुवनेश्वरहून राउरकेला जाणारे विमान कोसळले

DMart संक्रांती सेल! स्टील भांडी फक्त 29 रुपयांपासून; किराणासह वाण साहित्य खरेदीसाठी रांगा, सर्व डिस्काउंट ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

Eknath Shinde: दोस्ती का महागठबंधन’चा महापौर असणार, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : आम्हाला मदत करण्यात सध्याच्या सरकारने मोठी भूमिका बजावली - गोविंदा आहुजा

SCROLL FOR NEXT