कोकण

रत्नागिरी- अन्य क्षेत्रातही करिअरच्या मोठ्या संधी

CD

94710

अन्य क्षेत्रातही करिअरच्या मोठ्या संधी
डॉ. चेतन औरंगाबादकर; फाटक हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : डॉक्टर, इंजिनिअरिंगबरोबरच अन्य क्षेत्रातही करिअरच्या खूप मोठ्या संधी असून, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायाम, खेळ आणि छंद जोपासायला हवा, असे प्रतिपादन डॉ. चेतन औरंगाबादकर यांनी केले. फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला वाणिज्य व (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दहावी, बारावीच्या गुणगौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर, उपाध्यक्ष प्रकाश सोहोनी व अॅड. विनय आंबुलकर, कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये, सचिव दिलीप भातडे आदी प्रमुख उपस्थित होते. विविध देणगीदारांनी संस्थेकडे ठेवलेल्या देणगीच्या व्याजातून विद्यार्थ्यांना रोख रकमांचे बक्षीस देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
शाळेचा दहावीचा निकाल 99.53 टक्के लागला. यात सई अवसरे, वीणा काळे, मिहिका परांजपे यांनी यश मिळवले. बारावीच्या परीक्षेत कला शाखेत प्रतीक मोहित, सुजल कांबळे, सेजल जाधव यांनी; वाणिज्य शाखेत अनुश्री रसाळ, सृष्टी नार्वेकर, मानस जोशी आणि विज्ञान शाखेत साकार अंबुरे, ऋचा करमरकर, अथर्व डोंगरे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विषयांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचेही कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बारावीत संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवल्याबद्दल अनुष्का करमरकर, केयूर कुलकर्णी यांचा सत्कार केला. विषय अध्यापनातील उल्लेखनीय यशाबद्दल अजित चवेकर, नेहा शेट्ये, राजाराम पानगले, मंजिरी आगाशे, दिनेश नाचणकर, अनंत जाधव या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नेहा म्हाब्दी, आरती पाथरे आणि रमेश काटकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

SCROLL FOR NEXT